अश्गाबात : स्वर्ग आणि नरक याबद्दल तुम्ही अनेकदा ऐकतो. पण त्याची फारशी माहिती कोणालाच नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत ज्याला नरकाचा दरवाजा असं म्हटलं जातं. मात्र त्याचे रहस्य आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्कमेनिस्तानमध्ये एक मोठा खड्डा आहे आणि त्यातून गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून यामधून ज्वाळा निघतायत. म्हणूनच या खड्ड्याला नरकाचा दरवाजा म्हणतात. हा खड्डा पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल.


चुकून कोणी या खड्ड्यात पडलं तर काही सेकंदात त्याचा जीव जातो. तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून सुमारे 260 किमी अंतरावर काराकुम वाळवंटातील दरवेझ गावात हा खड्डा आहे. असं म्हटलं जातं की, जमिनीच्या आत असलेल्या मिथेन वायूमुळे 1971 पासून याठिकाणी ज्वाळा दिसतात. हा खड्डा कसा बनवला गेला यामागे एक रंजक कथा असल्याचं मानलं जातं.


असं म्हटलं जातं की, 1971 मध्ये सोव्हिएत युनियनच्या शास्त्रज्ञांनी इथला मिथेन वायू जमा करण्यासाठी ड्रिल केलं होतं. एके दिवशी येथे स्फोट झाला, त्यानंतर 'डोअर ऑफ हेल' या नावाने प्रसिद्ध असलेला हा खड्डा बनला. या दुर्घटनेनंतर मिथेन वायू वातावरणात पसरू नये म्हणून शास्त्रज्ञांनी याठिकाणी आग लावली. ही आग एक-दोन आठवड्यांनंतर थांबेल, असं त्यांना वाटत होतं, परंतु आजपर्यंत ही आग सतत धगधगत आहे.


ज्या खड्ड्यात ज्वाळा दिसतायत तो खड्डा 229 फूट रुंद आणि सुमारे 65 फूट खोल आहे. आज हे ठिकाण एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र बनलंय. हा खड्डा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोकं येतात. हे ठिकाण आता पर्यटनस्थळ बनलंय.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)