Weird Tradition : `या` ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत.
Weird Tradition : जन्म आणि मृत्यू हा कोणाचाही हातात नसतो. आपल्या जन्माची आणि मृत्यूची तयारी हे आपले कुटुंबातील लोक करतात. जन्म म्हटला की आनंदाने मुलगा किंवा मुलगी यांच्या गोड बातमीची आपण वाट पाहत असतो. त्या चिमुकल्याच्या आगमनासाठी आपण भरपूर तयारी करतो. पण मृत्यू ही दु:ख देणारी घटना आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाणाने आपण तुटून पडतो. त्या व्यक्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी कुटुंबिय सदस्य करतात. जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा कोणाला थांबवता आलेला नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगाच्या पाठीवर एक असा देश आहे जिथे लोक आपल्या अंत्यसंस्काराची तयारी आनंदाने जिंवतपणीच करुन ठेवतात. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूची खरेदी उत्साहाने करतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी खास महोत्सवाचं आयोजन केलं जातं. (this place people are shopping for their favorite graves clothes and coffins before they die weird tradition in japanese Shukatsu Festa 16 December)
शुकात्सू उत्सव (Shukatsu Festival)
हा उत्सव ज्याला शुकात्सू असं म्हणतात तो जपानमध्ये होतो. जपानची राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) अंत्यसंस्कार व्यवसाय मेळाव्याचं आयोजन केलं जातं. हा उत्सव दरवर्षी 16 डिसेंबरला होतो. या उत्सवात लोक अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी खास करुन खरेदीसाठी येतात.
हा जपानमधील लोकांचा शुकात्सु फेस्ता (Shukatsu Festa) सण आहे. या उत्सवामध्ये लोक त्यांच्या अंत्यसंस्काराचा ड्रेस खरेदी करतात. त्यासोबतच फुलांनी भरलेल्या शवपेटीची (Coffin) तर पसंत करतात. शिवाय त्यात झोपूनदेखील पाहतात. विचित्र म्हणजे ही खरेदी ते आनंदाने करतात आणि ही खरेदी करताना ते फोटो देखील काढतात. एवढंच नाही तर लोक स्मशानभूमीत (cemetery) प्लॉट खरेदी करुन ठेवतात.
मृत्यू या शब्दाची इथे प्रत्येकाला भीती वाटते. पण या देशात मृत्यूचा उत्सव (celebration of death) साजरा करण्यात येतोय. ही कल्पना आपल्याला विचित्र वाटेल पण इथल्या लोकांसाठी ती प्रथा आहे. त्यांना शुकात्सू महोत्सवातून मृत्यूशी संबंधित गोष्टींची शिकवण दिली जाते.
शुकात्सु म्हणजे काय?
जपानी भाषेत 'शुकात्सु' (Shukatsu) म्हणजे एखाद्या शेवटाची तयारी करणं. या व्यवसायाला 'एडिंग इंडस्ट्री' (Ending Industry) असंही म्हटलं जातं. या उत्सवामागील कारण म्हणजे मृत्यूनंतर काय होतं आणि त्यांच्या पाश्चात असलेल्या लोकांचं काय होतं याची जाणीव त्या लोकांना करुन दिली जाते. मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचं शरीर कसं तयार करावं हे देखील यातून शिकवलं जातं. या उत्सवात ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुणांचीही मोठी संख्याही दिसून येते.