मुंबई : इंटरनेट व्हायरल झालेल्या व्हिडिओंनी भरलेलं दिसतंय. यू ट्यूबवर किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ तुमचंही ज्ञान वाढवत असतील... यामध्ये जशा थरारक घटनांचा समावेश असतो तसेच कॉमेडी व्हिडिओही दिसत असतात. सध्या इंटरनेवर चर्चेचा विषय ठरलाय तो एक खराखुरा 'हिरो'... हा हिरो म्हणजे एखादी व्यक्ती नाही तर कुत्रा आहे... आणि त्याचं नाव आहे 'ऑफिसर पॉन्चो'...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माद्रिद पोलिसांच्या डॉग स्कॉडमध्ये 'ऑफिसर पॉन्चो'चाही समावेश आहे. एका पोलिसाचा जीव वाचवण्याचा पॉन्चोचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. त्याचा हा व्हिडिओ अनेकदा रिट्विट करण्यात आलाय... पॉन्चोला कार्डिओप्लमनरी रिससिटेशन अर्थात सीपीआरची ट्रेनिंग देण्यात आलंय. 



या व्हिडिओतच एक पोलीस जमीनीवर पडून बेशुद्ध होण्याचं नाटक करतो. पॉन्चो हे पाहतो आणि धावत जाऊन पोलिसाच्या छातीवर दाब देण्याचा प्रयत्न करतो. इतकंच नाही तर तो पोलिसाच्या जवळ गळ्याजवळ तोंड नेऊन त्याची श्वसनप्रक्रियाही तपासतो. 


'कुत्रा हा एकमेव प्राणी आहे जो तुमच्यावर तुमच्यापेक्षाही जास्त प्रेम करतो' असं ट्विट माद्रिद पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर करताना केलंय.