Indian Navy: भर समुद्रात थरार घटना घडली आहे. सुमद्री डाकूंनी एक विदेशी जहाज हायजॅक केले होते. भारतीय नौदलाने या जहाची सुटका केली आहे. अरबी समुद्रात माल्टा जहाजाचे अपहरण करण्यात आले. या जहाजावर 18 क्रू मेंबर्स होते. या सर्वांची भारतीय वायु दलाने दाखवलेल्या तप्तरतेमुळे सुटका झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माल्टाचे एमव्ही रौएन या जहाजाचे अपहरण झाले होते. भारतीय नौदलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला.  एक युद्धनौका आणि सागरी गस्ती विमान एम अरबी समुद्रात पाठवले.  माल्टाचे जहाज कोरियाहून तुर्कियेला जात निघाले होते. यावेळी सोमालियातील समुद्री चाच्यांनी जहाजावर हल्ला केला आणि या जहाजाचे अपहरण केले.  भारतीय नौदलाने पाठवलेल्या विमानाने शुक्रवारी, 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अपहरण केलेल्या जहाजावरून उड्डाण केले. भारतीय नौदलाची विमाने या जहाजाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. हे जहाज आता सोमालियाच्या दिशेने प्रवास करत आहे.


समुद्री चाच्यांनी केले जहाजाचे अपहरण


माल्टाचे जहाज कोरियाहून तुर्कीच्या दिशेने निघाले असताना समुद्री चाच्यांनी या जहाजावर आक्रमण केले. या जहाजाने मदतीसाठी संदेश पाठवले. भारतीय नैदालाने तात्काळ वायुदलाची मदत घेत या जहाचे लोकेशन शोधून  काढले. यानंतर एक  युद्धनौका आणि सागरी गस्ती विमान या अपहरण झालेल्या जहाच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. 14 डिसेंबर रोजी माल्टाचे जहाजने मदतीसाठी संदेश पाठवला होता. त्यानंतर तात्काळ त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यात आली आणि माल्टा जहाजाची समुद्री डाकूंच्या तावडीतून सुटका करण्यात आली.


यापूर्वी 2019 मध्ये असा प्रकारच्या घटना घडल्या होत्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता.  केनियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत देखील चर्चा केली होती.  इतर देशांसोबत भारत देखील अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात वेळोवेळी समुद्री चाचेगिरीविरोधी कारवाया करत आहे.