चित्तथरारक! प्राणिसंग्रहालयात वाघाचा महिलेवर हल्ला
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका प्राणी संग्रहालयात वाघाने एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे.
मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका प्राणी संग्रहालयात वाघाने एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे.
अचानक केला महिलेवर हल्ला
महिला कर्मचारी वाघाला त्याचा खुराक देऊन परत येत असतांना वाघाने अचानक या महिलेवर हल्ला केला आणि तिला फरपटत आपल्या गुहेपर्यंत घेऊन गेला. या महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं पण गंभीर अवस्थेत या महिलेला रुगणालयात दाखल केलं.
चित्तथरारक घटना
कलिंनिग्राड प्राणी संग्रहालयात टायफून नावाच्या वाघाने महिलेवर हल्ला केला. वाघ पाहण्यासाठी आलेले पर्यटक हा सर्व चित्तथरारक प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहत होते. काहींनी दगडी, खुर्च्या आणि मिळेल ते वाघावर फेकले. आपल्यावर हल्ला होत असल्याचे पाहता वाघाने महिलेला सोडलं आणि तेथून निघून घेला.
हल्ल्यात या महिलेचा जीव वाचला असला तरी महिलेला खूप ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून रिकव्हर व्हायला वेळ लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.