Joseph Bruce Ismay: टायटॅनिक हा चित्रपट आपण अनेकदा पाहिला आहेच. 1912 साली घडलेल्या त्या घडनेचे पडसाद आजही अनेकांच्या मनात कायम आहे. इंग्लंडच्या साऊथ हैंप्टनपासून न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास करत असणाऱ्या 2200 प्रवाश्यांपैकी 1500 प्रवाशांचा टायटॅनिकच्या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. ही घटना जगभरात काही क्षणातच पसरली. समोर आलेल्या हिमनगाच्या टोकाला धडकून टायटॅनिक बोटीचा मोठा भाग तुटला होता आणि त्यामुळे टायटॅनिक बोट बुडाली होती. त्यामुळे अनेक लोकांना आपले जीव हे गमावावे लागले होते. या घटनेबद्दल अनेक जण अद्यापही संशोधन करताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर अनेकांनाही या घटनेबद्दल आकर्षण असल्यानं त्याबद्दलची अनेक माहितीही काढली जाते. या घटनेतील अनेक पात्र आहेत जी लोकांच्या आजही लक्षात आहेत. त्यातील एक म्हणजे जोसेफ ब्रुस इस्मे. इंग्लंडमधील जोसेफ ब्रुस इस्मे हा इसम अत्यंत श्रीमंत मानला जात होता. त्यामुळे त्याची ख्यातीही त्याकाळी खूप होती. जोसेफ ब्रुस इस्मे हा टायटॅनिकचा मालक होता त्यामुळे टायटॅनिक आपल्या पहिल्या प्रवासाला निघाली होती तेव्हा तो त्या बोटीतही होता. परंतु तुम्हाला माहिती का की हा जोसेफ ब्रुस इस्मे 15 एप्रिलच्या रात्री टायटॅनिक बोट बुडाली तेव्हा स्त्रियांचे कपडे घालून पळून गेला होता. 


त्यावेळी जोसेफ ब्रुस इस्मे याच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले होते. त्याच्यावर पहिला आरोप असा झाला होता की, जोसेफ ब्रुस इस्मे हा टायटॅनिक बोट बुडत असताना पळून गेला होता. त्याचबरोबर तो महिलांच्या लाईफबोटमध्ये बसून जीव वाचवत निघून गेला होता. त्याच्यावर इंग्लंडच्या कोर्टात अनेक खटलेही करण्यात आले होते. टायटॅनिक बोट बुडताना जोसेफ ब्रुस इस्मे यानं महिलांचे कपडे घातले होते आणि महिलांच्या ग्रुपसोबत तो पळून गेला होता. 


कोण होता जोसेफ ब्रुस इस्मे? त्याचे आयुष्य अंधकारात का गेले?


त्याच्यावर झालेल्या खटल्यांमधून त्याला निर्दोष मुक्तताही मिळाली होती. 1937 साली जोसेफ ब्रुस इस्मेचा मृत्यू झाला होता. टायटॅनिकची घटना घडल्यानंतर तो स्टॉटलंडला निघून गेला होता. त्यानंतर तो त्याच्या कुटुंबियांसमवेत होता. एका मुलाखतीतही त्यानं आपल्या अनुभवांबद्दल आणि आपल्या नातवाबद्दलही सांगितले होते. त्याचे असे म्हणणे होते की त्याला अमेरिकेच्या सरकारकडून आणि पत्रकारांकडून फार त्रास सहन करावा लागला होता. 


टायटॅनिक बोट ही जोसेफ ब्रुस इस्मे मुळे बुडाली असाही त्याच्यावर आरोप केला जातो परंतु त्यावर अनेकदा चर्चाही झाली होती. माध्यमांमध्ये तेव्हा जोसेफ ब्रुस इस्मे हे नावं प्रचंड गाजले होते. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे जोसेफ ब्रुस इस्मे तणावात होता त्याचबरोबर त्याला नैराश्यानंही घेरल