वॉशिंगटन: कासव शाकाहारी की मांसाहारी असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्की पडेल. कारण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना हा प्रश्न आता पडला आहे. शाकाहारी म्हणून ओळख असलेल्या कासवानं चक्क शिकार केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कासवाने चक्क चिमणीची शिकार केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेम्ब्रिज युनिव्हर्सिटीने आपल्या ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कासव चिमणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हल्ला चुकवण्यासाठी ती प्रयत्न करते मात्र अखेर कासव तिच्या मानेवर हल्ला करून तिला ठार करतं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. 



ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कासवाला शाकाहारी समजलं जातं आणि याच कासवाने चक्क चिमणीची शिकार केल्यानं अनेकांना हा मोठा धक्का होता. या कासवाला चिमणीची शिकार करायला 7 मिनिटं लागली.