बांगलादेशमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; बस चालकाच्या मुर्खपणामुळे 11 जणांचा बळी
बांगलादेशमध्ये टूर बस आणि ट्रेनची जोरदार धडक झाली. या धडकेत बसचालकासह 10 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे
बांगलादेश : बांगलादेशमध्ये टूर बस आणि ट्रेनची जोरदार धडक झाली. या धडकेत बसचालकासह 10 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण गंभीर जखमी आहे. ड्युटीवर असलेल्या गेटमनने रेल्वे क्रॉसिंगवर बार खाली केला होता. तरी टूर बसने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा भीषण अपघात घडला. स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या चट्टोग्राम जिल्ह्यात ढाकापासून 150 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. तर रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास मीरशराईमधील बोरोटाकिया स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ ट्रेन आणि बसची धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी 9 जणांची ओळख पटली आहे. सर्व मृत पर्यटक हे हाथाजरी उपमामधील अमन बाजार परिसरातील आर एण्ड जे प्लस या कोचिंग क्लासचे विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. मृतांमध्ये 4 शिक्षक आहेत आणि बाकी विद्यार्थी आहेत.
ही टूर बस पर्यटकांना घेऊन चट्टोग्राम जिल्ह्यातील मीरशाराई परिसरातील खोईयाचोरा या धबधब्याकडे जात होती, तेव्हा हा अपघात झाला.
एक किलोमीटरपर्यंत बस फरफटत गेली
या टूरमधील 3 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर चट्टोग्राम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रत्यक्षदर्शिने दिलेल्या माहितीनुसार खोईयाचोरा धबधबा पाहून पर्यटक ढाका परत होते. त्यावेळी रेल्वे क्रासिंगला बस आणि प्रोभाती एक्स्प्रेस ट्रेनची धडक झाली. ड्युटीवर असलेल्या गेटमनने रेल्वे क्रॉसिंगवर बार खाली केला होता. तरी बस चालकांच्या मुर्खपणामुळे बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा बळी गेला.