वॉशिंग्टन : ट्रान्सजेंडर व्यक्तिंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेतील एका ट्रान्सजेंडर पुरूषाने चक्क एका बाळाला जन्म दिला आहे. विशेष असे की, हा व्यक्ती गेली अनेक वर्षे महिला म्हणून जगत होती. जन्मास आलेले बाळ हे त्याचे पहिले अपत्य आहे. विस्कॉन्सिनयेथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या केसी सोलिवन याला जगातील पहिला व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. ज्याने पुरूष आणि महाल दोन्ही रूपांमध्ये राहात एका बाळाला जन्म दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलिवनला त्याच्या पहिल्या नवऱ्यापासून जन्मलेला एक मुलगाही आहे. ज्याचे नाव ग्रोसन असे आहे. तो आता 5 वर्षांचा आहे. ग्रोसनचा जन्म झाला तेव्हा सोलिवन (ट्रांजिशनपूर्वी) एक महिला म्हणून जगत असे. दरम्यान, जन्माला आलेले बळ पूर्णपणे सुरक्षीत असून, त्याचे वजन 3.6 किलो ग्रॅम इतके आहे. दरम्यान, 4 वर्षांपू्र्वी सोलिवन हिने महिलेच्या रूपातून पुरूषाच्या रूपात येण्यासाठी ट्रांजिशन सुरू केले होते. त्यावेळी ती बिजनेस स्टुडंट होती.


दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर या कपलने आपल्या सेक्सबद्धल खुलासा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना वाटते की मोठे झाल्यावर मुलांनी स्वत: आपल्या लिंगाबद्धल (स्त्री की पुरूष) निर्णय घ्यावा. सोलिवन सांगतात की, ते जेव्हा गरोदर राहिले तेव्हा लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पहायला लागले. सोशल मीडियातून त्यांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच, अनेकांनी त्यांना शिव्याही दिल्या. पण, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.