येथील परंपरा जगाच्या अगदी विरुद्ध...महिलांना पुरुषांप्रमाणे तर, पुरुषांना महिलांप्रमाणे नियम
आज आम्ही आपल्याला अशाच एका टोळीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या प्रथा इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहेत
मुंबई : जगात इतके देश आहेत ज्यांच्या भाषांपासून ते त्यांच्या परंपरेपर्यंत सगळं काही एकमेकांपेक्षा वेगळं असतं. हे जग विचित्र परंपरा आणि रूढींनी परिपूर्ण आहे. परंतु तुम्हाला असे सांगितले तर की, या जगात असा एक भाग आहे जेथे मुलींना मुलांना मिळणारे सर्व स्वातंत्र्य आहे. महिला कितीही लग्न करु शकतात. एवढेच नाही तर येथील पुरुष हे महिलांप्रमाणे आयुष्य जगतात. परंतु कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.
आज आम्ही आपल्याला अशाच एका टोळीबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या प्रथा इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहेत आणि त्या ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल.
पश्चिम आफ्रिकेच्या नायजरमध्ये राहणाऱ्या तुआरेग लोकांमध्ये (Tuareg people) स्त्रियांना त्यांना हवे असलेल कोणतेही काम करण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. येथे लग्नाआधी स्त्रियांना बर्याच पुरुषांशी संबंध ठेवण्याची देखील परवानगी आहे. परंतु येथील पुरुषांना मात्र बुरख्यामध्ये रहावं लागतं आणि कुठेही जाण्यापूर्वी त्यांना परवानगी घ्यावी लागते.
परंपरेनुसार महिला त्यांच्या स्वत:च्या इच्छेनुसार लग्न करू शकतात. इतकेच नाही तर लग्नानंतरही तिचे कोणत्याही पुरुषाशी संबंध असू शकतात. तर पुरुषांना आपला चेहरा समाजापासून लपवून ठेवावा लागतो. तसेच तुआरेगच्या (Tuareg people) महिला प्रधान देशामधील स्त्रियांना जर त्यांच्या पतीला सोडून द्यायची इच्छा झाली असेल तर त्या त्यांच्या नवऱ्याला सोडू शकतात.
तुआरेग (Tuareg people) समाजात महिलांचा विवाह आणि घटस्फोट हे सामान्य आहे. येथे घटस्फोट मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून उत्सव साजरा केला जातो. घटस्फोट घेतल्यास, महिला त्यांना पाहिजेते करु शकतात.
याशिवाय येथील महिला कोणताही बुरखा, पदर किंवा परदा घेत नाहीत, कारण त्यांचे चेहरे पुरुषांना दिसायला हवे. येथे पुरुषांना मोठे निर्णय घेण्यासाठी महिलांची परवानगी घ्यावी लागते.
या समाजाची ही परंपरा खूप जुनी आहे. ही अनोखी परंपरा आपल्या समाजातील पुरुषांना मिळणारे सर्व स्वातंत्र्य स्त्रियांना देतात.