Trending News : खेळण्यातील बंदूक दाखवून एका मुलीने चक्क बँक लुटली (Bank Robbed). बँकेतील 10 लाख रुपये घेऊन ती फरार झाली. मजेशीर गोष्ट म्हणजे त्या मुलीने आपल्या खात्यात जमा केलेले पैसेच लुटले. बँक लुटतानाचा व्हिडिओही (Video) बनवण्यात आला असून तो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या मुलीचे फोटोही व्हायरल होत असून लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण लेबनान (Lebanon) मधलं आहे. बँक लुटणाऱ्या त्या मुलीचं नाव साली हाफिज (Sali Hafiz) असून ती 28 वर्षांची आहे. बुधवारी खेळण्यातलं बंदूक (Toy Gun) घेऊन ती Beirut बँकेत पोहोचली. बँकेत पोहोचताच तीने बंदूक दाखवून फिल्मी स्टाईलमध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदूकीने धमकावत पैसे मागितले. मुलीच्या हातातील बंदूक पाहूक बँकेत एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.


कर्मचाऱ्यांची अवस्था पाहून साली हाफिजने मी कोणालाही मारायला इथे आलेले नाही, मला फक्त माझे पैसे हवे आहेत असं सांगितलं. साली हाफिज हिचे पैसे गेल्या काही वर्षांपासून बँकेत अडकले होते. पण काही ना काही कारणांमुळे तिला बँकेतून पैसे मिळत नव्हते. अखेर साली हाफीजने आपले पैसे मिळवण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. हाफिजने कॅश काऊंटरवर असलेल्या कर्चमचाऱ्याला बंदूक दाखवत आपल्या खात्यातील 10 लाख 33 रुपये काढून घेतले.


बहिणीच्या उपचारासाठी हवे होते पैसे
पैसे लुटण्याची वेळ का आली याचं कारण साली हाफीजने सांगितलं आहे. तिच्या बहिणीला कॅन्सरचं (Cancer) निदान झालं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या उपचारासाठी हाफीजला पैशाची तातडीने गरज होती. उपचारांसाठी एकूण 40 लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. बँकेत 16 लाख रुपये जमा होते, पण गेल्या तीन वर्षांपासून ते तिला काढता येत नव्हते.



बँकेकडून एका वेळेला केवळ 15 हजार रुपये दिले जात होते. त्यामुळे निराश झालेल्या हाफीजने हे धोकादायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. 16 लाखातले 10 लाख रुपये तीने बँकेतून काढून घेतले.


2019 पासून लेबनान आर्थिक संकटात सापडला असून बँकेत जमा करण्यात आलेल्या ठेवी तीन वर्षांपासून गोठवल्या आहेत. आपलेच पैसे काढण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. बँकेकडून केवळ ठराविक रक्कम ग्राहकांना दिली जात आहे.