Girlfriend's Unique Revenge : असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. प्रेमात जात-धर्म, वयाचं बंधन नसतं. प्रेम करण्यासाठी हवी असते ती फक्त जोडीदाराची साथ. पण हाच जोडीदार जेव्हा दगा देतो तेव्हा मात्र मनावर खोल जखम होते. अनेकवेळा या परिस्थितीतून बाहेर येण्यास मुलगी किंवा मुलाला बराच कालावधी लागतो. काही वेळा दगा देणाऱ्या जोडीदारावर सूड उगवला जातो. पण एका प्रेयसीने (GirlFriend) आपल्या प्रियकराला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला आहे. या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला (Boyfriend) मारहाण किंवा शिविगाळ केली नाही. पण तीने घेतलेल्या निर्णयाने बॉयफ्रेंडला 'जोर का धक्का' नक्कीच बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्लफ्रेंडने उचललं असं पाऊल
एक मुलीचं आपल्या प्रियकराबरोबर ब्रेकअप (Berakup) झालं. दोघंही एकमेकांपासून दुरावले. पण मुलीच्या मनात प्रियकरावर सूड (Revenge) उगवण्याचा कट शिजत होता. यासाठी तीने धक्कादायक पाऊल उचललं. ही मुलगी बॉयफ्रेंडची सावत्र आई (Step Mom) म्हणून त्याच्या घरात आली. तीने थेट बॉयफ्रेंडच्या वडीलांशीच लग्न केलं. इतक्यावरच ती थांबली नाही. बॉयफ्रेंडच्या भावाच्या लग्नात ती अत्यंत साधेपणाने सहभागी झाली. इतर नातेवाईकांनी चांगले कपडे, मेकअप, हेअरस्टाई करुन सहभागी झाले असताना या मुलीने साध्या कपड्यात प्रवेश केला. केवळ बॉयफ्रेंडला डिवचण्यासाठी तीने हा निर्णय घेतला होता. 


मुलीने आपल्या बॉयफ्रेंडवर उगवलेला हा सूड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. जिच्याबरोबर प्रियकराने सात जन्माची स्वप्न पाहिली होती, तिच आता त्याची आई बनून त्याच्या घरात आली आहे. 


विमानातला फोटो व्हायरल
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत विमानात अश्लील प्रकार करणाऱ्या एका जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर  (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. हे कपल विमानात आपल्या सीटवर चक्क एकमेकांना बिलगुल झोपले होते. विमानातील सहप्रवाशाने याचा फोटो घेत सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडिया एक्स अकाऊंट  @babyibeenajoint हा फोटो शेअर करण्यात आला होता. यासोबत त्याने कॅप्शन लिहिलं होतं केवळ चार तासांच्या विमान प्रवासात आणखी काय पाहायला मिळणार माहित नाही' असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. 


हा फोटो आतापर्यंत 2.1 कोटी लोकांनी पाहिला असून लाखो लोकांनी कमेंट दिल्या आहेत. अनेक लोकांनी कपलच्या या प्रकारावर आक्षेप नोंदवला आहे. विमानातील कर्मचाऱ्यांनी या कपलवर कारवाई करायला हवी अशी मागणीही अनेकांनी केली.