Sea Surfing Viral Video: सोशल मीडिया (Social Media) वर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले कोणते व्हिडिओ कधी व्हायरल होतील याचा काही नेम नाही. धाडसी, विनोदी आणि रोमँटिक व्हिडिओना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते. लाईक्स (Like) आणि कमेंट (Comments) मिळवण्यासाठी अनेक जण असे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ पाहून युजर्स त्या मुलीच्या धाडसाचं अक्षरश: कौतुक करत आहेत. व्हिडिओत एक मुलगी उधाण आलेल्या समुद्रात ऑफिसच्या ड्रेसमध्ये चक्क सर्फिंग करत ऑफिसचं काम करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिगला आहे.


सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाराहा व्हिडिओ सिल्विया वालेन (Silvia Vallen) मुलीचा असून तीनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सिल्विया वालेनने समुद्राच्या लाटेवर स्वार होत धाडसी कसरती केल्या आहेत. या व्हिडिओत तुम्ही बघू शकता, सिल्विया ऑफिस ड्रेसमध्ये दिसत असून ती सर्फिंग करता करताच लॅपटॉपवर काम करतेय, तसंच मोबाईलवरही बोलताना दिसत आहे.



व्हिडिओला 5 लाख व्ह्यूज
सिल्विया वालेन ही प्रोफेशनला सर्फर आहे. तीने असे अनेक थरारक व्हिडिओ बनवले आहेत. पण ऑफिस लूकमधला हा व्हिडिओ लोकांच्या अधीक पसंतीस पडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.