Viral Video : बालपणी अनेक मुलांनी आपल्या पालकांच्या लग्नाचा अल्बम पाहिल्यानंतर एक प्रश्न हमखास विचारला आहे. तुमच्या लग्नात आम्ही कुठे होतो, आम्हाला लग्नाला का नाही बोलवलं असे अनेक प्रश्न... आई वडिलांच्या घटस्फोट असो किंवा पालकांपैकी कोणाचं तरी अकस्मित जाणं असो. पूर्वी पुर्नविवाहची केले जात नव्हते. मात्र पण जग बदलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वयाच्या प्रत्येक टप्पावर जीवनसाथीची गरज असते हे आता घरच्यांसोबत मुलांनाही कळलं आहे. (trending news son attends mother marriage thanks groom for wedding speech viral video on Internet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका मुलाला त्याच्या आईच्या लग्नात सहभागी होता आलं. या लग्नात त्याने मी नवरीचा मुलगा आहे असं म्हणत पुढे जे काही बोललं ते ऐकून वर आणि वऱ्हाडीही आश्चर्यचकित झाले. 


एवढ्या लहान वयात त्याने जो समजूतदारपणा दाखविला त्यानंतर त्याने जे भाषण केलं त्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एका टेबलवर वधू आणि वर बसलेले दिसत आहेत. नवरीचा मुलगा माइक घेऊन येतो आणि बोलायला लागतो. 


तो म्हणाला की, माझं नाव जॉर्डन आहे. मी वधूचा मुलगा तर वराचा बेस्ट मॅन, आज मी अधिकृतरित्या त्यांचा सावत्र मुलगा झाला आहे. आपल्या आयुष्यातील प्रेमाशी लग्न करत असलेल्या विनी म्हणजे वराच्या पाठीमागे मी उभा राहण्यात मला धन्य वाटत आहे. खरं तर ते माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम आहे. 


तो पुढे जे म्हणाला ते ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला की, इथे सर्वांना माहिती आहे की,  विनीला चांगली डील आवडते. जे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यांनी पूर्ण बक्षीस दिले आहे, तेही कोणतेही संशोधन न करता. पहिलं म्हणजे आपलं इथे का आहोत. त्याने माझ्या आईसोबत एक संधी पाहिली एक विनामूल्य स्टिकरसह. म्हणजे असं की, विनीने माझ्या आईला आणि माझ्याकडे पॅकेज डील म्हणून पाहिलं. विनी माझ्या आईशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद. तू जो हरवलेला तुकडा आहे ज्याची माझ्या आईला गरज आहे, हे आईलाही माहिती नव्हतं. आई, विनीला फक्त तुझ्यासाठीच नाही तर आपल्यासाठी निवडल्याबद्दल धन्यवाद. 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील goodnews_movement या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून यूजर्सला या मुलाचं भाषण आवडतं आहे.