वडिलांचं 60 वर्षांपूर्वीचं पासबूक सापडलं, मुलाचं एका रात्रीत नशीब पालटलं
घराची साफसफाई करताना त्याला वडिलांचं जूनं पासबूक सापडलं आणि...
Trending News : कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. एका रात्रीत रंकाचा राव, तरा रावाचा रंक होतो. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. महत्वाची कागदपत्र आपण नेहमीच जपून ठेवतो, कधी कोणत्या कामासाठी त्याचा उपयोग होईल हे सांगता यते नाही. अशाच जपून ठेवलेल्या कागदपत्रांमुळे एक तरुण रातोरात कोट्यधीश झाला.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण दक्षिण अमेरिकेतील आहे. इथं रहाणाऱ्या एक्सकेल हिनोजोसा नावाच्या तरुणाला घराची साफसफाई करताना वडिलांचं साठ वर्षांपूर्वीचं बँकेचं पासबूक सापडलं. हिनोजोसा याच्या वडिलांनी 1960 साली म्हणजे सत्तरच्या दशकात घर घेण्यासाठी 170 डॉलर जमा केले होते. क्रेडिट यूनियन बँकेत ही रक्कम त्यांनी आपल्या खात्यात जमा केली होती. कालांतराने हिनोजोसो यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची सर्व कागदपत्र हिनोजोसा यांनी सांभाळून ठेवली होती.
हिनोजोसाला सापडलं पासबूक
एकेदिवशी घराची साफसफाई करताना हिनोजोसाला जुनी कागदपत्र सापडली. सहज म्हणून ती कागदपत्र चाळत असताना त्याला क्रेडिट यूनियन बँकेचं 60 वर्षांपूर्वीचं पासबूक सापडलं. बँकेत जमा झालेल्या रकमेवर स्टेट गॅरंटी असं लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर हिनोजोसाने वडिलांनी जमा करण्यात आलेल्या पैशांवर 60 वर्षात किती व्याज झालेल याची मोजदाद केली. तेव्हा त्याला लक्षात आलं कि ती रक्कम आता 1.2 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 9.33 करोडच्या जवळपास झाली होती.
हिनोजोसाने तात्काळ ती रक्कम मिळवण्यासाठी सरकारकडे दावा केला. पण हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. कोर्टानेही हिनोजोसाच्या बाजूने निकाल दिला. वडिलांनी कठोर परिश्रम करुन ही रक्कम जमा केली आहे, त्यामुळे मुलगा म्हणून हिनोजोसाचा त्यावर हक्क असल्याचं कोर्टाने सांगितलं. हिनोजोसाच्या बाजूने निकाल लागल्याने त्याला जवळपास 10 कोटी रुपये मिळाले.