Trending News : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ विचार करायला लावणार असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओने घरगुती हिंसाचाराला (Domestic Violence) केवळ महिलाच बळी पडत नाहीत तर पुरुषांना याचा त्रास होतो अशी चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक व्यक्ती ऑफिसमधून घरी आलेला दिसतोय. घरी आल्यावर दरवाजात तो आपल्या पायातील बूट काढतो आणि डोक्यावरील हेल्मेट काढताना दिसतोय. त्याचवेळी आतल्या रुममधून संतापाने धावत बाहेर येते आणि पतीला थेट मारहाण करायला सुरुवात करते. व्हिडिओत ही महिला त्या व्यक्तीला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतेय. इतकी मारहाण करत असताना तो व्यक्ती मात्र निमूटपणे मारहाण सहन करताना दिसतोय. मारहाणीची ही सर्व घटनात घरातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. 


@cctvidiots या एक्स हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत एक पोस्टही लिहिण्यात आली आहे. '14 तास काम केल्यानंतर पती ऑफिसमधून घरी येतो. तो व्यक्ती कचरा बाहेर ठेवण्यास विसरला, यामुळे नाराज झालेल्या पत्नीने त्याला अमानुष मारहाण केली' सीसीटीव्हीतली ही घटना 29 जानेवारीची असल्याचं या फुटेजमधल्या तारखेवरुन दिसतेय. ही घटना नेमकी कोणत्या ठिकाणची आहे याचा मा्तर शोध लागलेला नाही.


सोशल मीडियावर वाद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 20 सेकंदाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांनी ही घरगुती हिंसेचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो असं काही जणांनी म्हटलंय. तर काही जणांनी पुरुषांनाही घरगुती हिंसाचारा सामोरं जावं लागतं, हे या व्हिडिओवरुन स्पष्ट होतं, असं काही युजर्सने म्हटलं आहे. 



घरगुती हिंसाचाराच्या घटना
घरगुती हिंसाचाराला बळी पडलेले अनेक पुरुष आपली खिल्ली उडवली जाईल या शरमेने याबाबत तक्रार दाखल करत नाहीत. एका युजरने म्हटलंय केवळ कचरा घराबाहेर ठेवला नाही म्हणून या महिलेने आपल्या पतीला इतकी मारहाण केली. तर इतर चुकांच्यावेळी ती त्याचे काय हाल करत असेल. 


केवळ कचरा बाहेर न ठेवल्यामुळे या व्यक्तील इतकी मारहाण केली का यात किती तथ्य आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पण सीसीटीव्हीत तो पुरुष घरगुती हिंसाचाराला बळी पडलाय हे नक्की.