Trending Viral Video : चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाच्या चाहुल लागल्यावर आईसोबतच अख्ख घर आनंदाने नाचू लागतं. प्रत्येक आईचं स्वप्न असतं मुलगा असो वा मुलगी पण बाळ निरोगी आणि सृदृढ व्हायला हवं. आज विज्ञानाने प्रगती केली आहे. बाळामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर टेस्ट आणि चाचण्यातून हे कळतं. पण क्वचितच हा अन्यय साधारण रोग असे असतात जे मुलाच्या जन्मानंतर कळतात. सोशल मीडियावर एलियन' सारख्या मुलाला व्हिडीओ व्हायरल होतो आहे. मुलाला पाहून डॉक्टरांसोबतच आईलाही मोठा धक्का बसला आहे. (Trending news women gave birth Alien and harlequin ichthyosis genetic disorder Video Viral on Internet today trends)


 'एलियन' सारख्या दिसणारा चिमुकलं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकला अगदी एलियन सारखा दिसतो. हा मुलाला पाहून आईच्या हृदयाला मोठा धक्काच बसला. चेहऱ्यारपासून संपूर्ण शरीर पांढरं असलेला हा चिमुकला हूबेहूब एका एलियन सारखा दिसतोय. असं वाटतं की त्याला सिमेंटचा लावलं आहे. या चिमुकल्याचा शरीरावर अनेक भेगाही दिसत आहेत. त्या चिमुकल्याचे तोंड  आणि डोळे लाल दिसतं आहेत. (Unique Child Birth News)


नेमकं झालं तरी काय या बाळाला?


एलियनसारखा दिसणारा हा चिमुकला त्याचं तोंडही पूर्णपणे बंद करु शकत नाही शिवाय डोळेही उघडू शकतं नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, नेमकं या मुलाला झालं तरी काय. तर या मुलाला दुर्मिळ असा हार्लेक्विन इचथायोसिस नावाचा अनुवांशिक आजार झाला आहे. या आजारामध्ये त्वचेवर वाईट परिणाम दिसून येतात. 


हार्लेक्विन इचथिओसिसने ग्रस्त असलेली बाळ ही अकाली जन्मलेली दिसतात. त्यांचं बहुतेक शरीर जाड आणि कडक त्वचेने झाकलेले असतं. शिवाय सिमेंटवर कशी क्रॅक असती तसं क्रॅक त्या बाळाच्या शरीरावर दिसते. सर्वात धक्कादायक आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आजारावर कोणताही उपचार नाही.  



 


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर  kbkonline या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे.