Viral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...
Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Extra Marital Affair Viral Video : नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. गेल्या काही वर्षांपासून बदलेल्या जीवनशैली आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा अजून काही...तो व्यक्ती घराबाहेर प्रेम शोधत...जेव्हा जी गोष्ट घरात कळते तेव्हा वाद, भांडण अगदी मारामारी पर्यंत गोष्टी जातात...नातं जपण्यासाठी प्रयत्नही केला जातो. पण नात्यामधील आलेल्या दरीमुळे ते नातं संपतं. लग्न आणि संसाराविषयी नवरा बायको दोघांनीही स्वप्न रंगवली असतात. पण दोघात तिसरा येतो तेव्हा या स्वप्नाना तडे जातात.
जसं नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं तसंच प्रियकर आणि प्रियसीचं नातं असतं. आज काल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
अन् पत्नीने तिला दुसऱ्या तरुणीसोबत...
सोशल मीडियावर अशाच विवाहबाह्य संबंधातील एक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत आहे. ज्यात पत्नीने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहात पडकलं. त्यानंतर जो काही हाय व्होल्टेज ड्रामा रंगला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे.
गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाल्कनीमध्ये नवरा बायकोचं जोरदार भांडण सुरु आहे. तर याच बाल्कनीच्या बाहेरील कटड्यावर एक तरुणी अंतर्वस्त्रात लपण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळाने नवरा बायकोमधील वाद संपतो आणि ती महिला तिथून निघून जाते. बायको गेली याचा अंदाज घेत तो बाल्कनीत येतो आणि गर्लफ्रेंडला हात देऊन आत घेतो. (trending video extra marital affair wife caught husband with another girl in bedroom girlfriend in innerwear on streets video viral)
हेसुद्धा वाचा - Video : पतीचा दुसऱ्या महिलेसोबत सुरु होता रोमान्स, बायको येताच अन् ती टॉवेलवरच...
त्यानंतर ती गर्लफ्रेंडला अंतर्वस्त्रातच धूम ठोकते, पण त्याची बायको तिथून गेली नसते. त्या तरुणीला पाहून ती परत तिच्या मागे धावते. अशाप्रकारे ती महिला आपल्या नवऱ्याला रंगेहात पडकते.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटर @crazyclipsonly या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्य खूप छोटं आहे, विश्वास आणि प्रेमाने नाती जपा. जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका. धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजूबत होतं.