Snake Fish Vidoe : साप (Snake Vidoe) , महाकाय क्रोबा (Croba), विषारी आणि जीव घेणारा हा प्राणी...ज्याचं नावही ऐकलं तरी आपल्या जीव कासावीस होतो. सोशल मीडियावर साप, क्रोबा आणि अजगराचे (python) अनेक भीतीदायक आणि हृदयाचे ठोके चुकविणारे व्हिडीओ पाहिला मिळतात. अख्खा माणसाला, भल्या मोठ्या बकरीला गिळताना आपण सापाला पाहिलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. तो पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एका इवल्याशा माशाने (Fish Vidoe) सापाला गिळलं, हो हे खरं आहे...


खरंच असं घडू शकतं का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाला हे खोटं वाटेल पण एक व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. काही लोकांना हा फोटोशॉपचा प्रकार वाटतो आहे. पण जे या व्हिडीओमध्ये दिसतंय ते नाकारता येणार नाही. निसर्ग खूप विचित्र आहे. यात अनेक रहस्य लपलेलं आहे. 11 सेकंदाचा हा थरारक व्हिडीओ आपल्याला निशब्द करतो. (trending video Fish eat snake viral on social media)


अन् मग सापाने...


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका खड्ड्यात पाणी असतं. तिथे साप पोहोचतो आणि त्या खड्ड्यातून एक मासा बाहेर येतो. मासा तोंड उघडतो आणि सापाला क्षणात तो गिळतो. काही क्षणात तो मासा अख्खा साप गिळतो. एखाद्या छिद्रात जावं तसा हा साप त्या माशाच्या तोंडात जातो. 



इवल्याशा माशांना साप घाबरतात!


हा व्हिडीओ Weird and Terrifying या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. एका संशोधनानुसार असं सांगितलं गेलं आहे की, माशांच्या काही प्रजाती आहेत ज्या लहान साप खातात. अरोवाना, पिरान्हा आणि पफरफिश या माशांना जगण्यासाठी भरपूर प्रथिने लागतात. या माशांना भक्षक मासे म्हणून ओळखलं जातं. हे मासे सापांसह इतर समुद्री प्राणी देखील खातात. हे पाहून असंच म्हणावं लागेल सापालाही इवल्याशा मासाची भीती नक्कीच आहे.