Shocking Video Viral : जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात नसतो. आपण कधी कोणाच्या पोटी जन्म घेतो कोणालाही ठाऊक नसतं. अगदी तसंच आपल्या कधी, कुठे कसा मृत्यू गाठेल हे सांगता येतं नाही. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय लग्न समारंभात नाचताना, कधी स्टेजवर वरमाला घालताना हृदयविकाराच्या झटक्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. धानीमनी नसताना आनंदाच्या क्षणात यमराज त्यांना गाठतोय. (trending video person died due to a car tire while walking on the road Video Viral on Social media)


श्वास रोखणारा थरार Video 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून एक तरुण आणि एक तरुणी दिवस रस्त्याच्या कडेवरुन शांतपणे बोलत चालत जात होते. दुसऱ्या बाजूने रस्त्यावर वाहनांची ये जा सुरु आहे.  अचानक त्या तरुणाना मृत्यूने गाठलं. धानीमनी नसताना त्या व्यक्तीच्या अंगावर गाडीचा टायर जोरदार येऊन धडकला. तो टार त्याचा डोक्याला लागल्यामुळे तो जागीच कोसळला. धक्कादायक म्हणजे या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. 


महिला शॉकमध्ये


या घटनेनंतर त्याचा सोबत असलेली तरुणीला जोरदार धक्का बसला आहे. ती आजूबाजूला बघते तिला काहीही कळतं नाही. ती त्या तरुणाला उठवायचा प्रयत्न करते पण तो जागेवरून उठत नाही. त्याचा शरीराची हालचाल दिसून येतं नाही. 


एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर @cctvidiots अकाऊंटवर  शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं म्हणजे काय, हा व्हिडीओ पाहून कळतं. म्हणून म्हणतात की काय, यमराज तुम्हाला कधी कुठे गाठतो ते कोणीच सांगू शकत नाही. 



गाडीवरुन जाताना अचानक नारळ पडलं अन्


काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती दुचाकीवरुन बिना हेल्मेट जात असताना अचानक त्याचा डोक्यावर झाडावरुन नारळ पडतो. त्यानंतर तो दुचाकीस्वार रस्त्याचा खाली पडतो. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याच बोलं जातं आहे. मृत्याचा हा थरार पाहून अनेक जण हैराण झाले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ride_xperience या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.