इवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video
Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...
Snake Viral Video : सापाचे (Snake) अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर (Social media video) पाहिला मिळतात. सापाचे शिकार करणारे धक्कादायक व्हिडिओ पाहून आपल्या थरकाप उडतो. साप आणि उंदीर (Snakes and Rats video) असो किंवा साप आणि मुंगूस यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ (fight videos) आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांना हैराण करतो. अच्छा आम्हाला सांगा जर साप मुंगीची (ant) शिकार करायला गेला तर कोण जिंकेल? काय वाटतं तुम्हाला सापासमोर कधी कोणाचा विजय झाला आहे का? विषारी आणि खतरनाक सापाने अनेकांचं जीवन संपवलं आहे. मग या छोट्या छोट्या मुंग्या सापासमोर काय करु शकणार...
हम किसी से कम नहीं!
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक भयानक आणि विषारी साप शिकार करण्याचा बेताने मुंग्यांच्या बिळात घुसला खरी पण त्याला काय ठाऊक होतं त्याचा सोबत पुढे काय होणार ते...माणसासह मोठ्या मोठ्या प्राण्यांना गळणारा साप छोट्याशा मुंग्यांसमोर हरला. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा मोठ्या संकटाशी आपण सामना करु शकतो. असंच काहीस या व्हिडिओमध्ये पाहिला मिळतं.
हेही वाचा - Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...
शिकार करण्यासाठी जेव्हा साप मुंग्यांच्या बिळात जातो तेव्हा या छोट्या छोट्या मुंग्यांना सापाच्या नाकीनाऊ आणतात. तो साप स्वत:चीच शिकार करुन बसतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो आपले प्राण वाचविण्यासाठी मुंग्यांवर शेपटीचा मारा करतो पण काही केल्या तो या मुंग्यांचा सापळ्यातून सुटू शकतं नाही. म्हणून म्हणतात की काय कधी कोणाला कमी समजू नका.
हा व्हिडिओ beautiful_new_pixandwild_animal_pix या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.