Trending Video: आज बघाव तिकडे फक्त एकच चर्चा आहे ती म्हणजे नोएडामधील अनधिकृतपणे बांधण्यात आलेली ट्विन टॉवरची. रविवारी दुपारी हे 32 मजली टॉवर काही सेकंदात पत्तासारखी कोसळून जाणार आहे. अशाप्रकारे एखाद्या अनधिकृत इमारतीला जमीनदोस्त करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी परदेशात अशा प्रकारे गगनचुंबी टॉवर काही क्षणात डोळ्यांसमोर कोसळतानाही दिसली आहे. (trending video twin tower and demolishing entire cities of half finished buildings in china viral video on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर आपण इमारत कोसळतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ  यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच दंग व्हाल. आकाशाला गवसणी घालणाऱ्या या उंच उंच इमारती काही क्षणात माती मोल होऊन जातात. दिसायला सुंदर आणि आकर्षक अशा या इमारतींचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला क्षणभर काही सुचणार नाही. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक नाही दोन नाही अख्ख शहरातील गगनचुंबी इमारती पत्तासारखी कोसळून गेली. हा व्हायरल व्हिडीओ चीनमधील असल्याचं बोलं जातं आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @danielrembrandt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 



हा व्हिडीओ शेअर केल्यावर आतापर्यंत  26 लाख वेळा बघितला गेला आहे. तर हा व्हिडीओ पाहून यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत.