Viral Video : पैशांचा माज! मर्सिडिज मालकाचं महिलेसोबत वाईट वर्तन, पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर (Social media) सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे अपघाताचे, चोरीचे असतात, तसेच गैरवर्तवणूकीचे देखील असतात.
Viral Video: सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना चीड आली आहे. कारण व्हिडिओत मर्सिडिज मालकाने पैशाचा माज दाखवला आहे. हा माज नटेकऱ्यांच्या पचनी पडला नसून त्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (trending video viral female gas station worker in china breaks down after man throw money ground video)
व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर (Social media) सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे अपघाताचे, चोरीचे असतात, तसेच गैरवर्तवणूकीचे देखील असतात.असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिड़िओत एका मर्सिडीजच्या मालकाने महिलेसोबत वाईट वर्तन केले आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेसोबत त्याने हे वर्तन केले आहे. त्याची ही कृती पाहून अनेकांना राग येतोय.
व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर (Petrol Pump) महिला कर्मचारी मर्सिडिज कारमध्ये (mercedes driver) पेट्रोल भरताना दिसत आहे. महिला कर्मचारी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करताना दिसत आहे, मात्र यादरम्यान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने महिलेसोबत असे काही केले की जे पाहून तुम्हाला राग येईल. त्याचं झालं अस की, कारमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर महिलेने नोझल काढून पंपाच्या मशिनवर टाकून उलटे ठेवले. यानंतर ती कार चालकाकडे पैसे मागायला गेली.यावेळी कार चालकाने तिच्या हातात पैसे देण्याऐवजी जमीनीवर फेकले.
पैसे जमीनीवर टाकल्यानंतर कार स्वार तिथून निघून जातो आणि महिला कर्मचारी शांतपणे पैसे उचलू लागते, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे पैसे उचलताना महिलेला अश्रू अनावर होतात. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हद्य भरून येत आहे. तसेच अनेकांकडून कार चालकावर संताप व्यक्त होतोय.
दरम्यान @TheFigen या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.