Zaouli Dance Viral Video  : सोशल मीडियावर क्षणाक्षणामध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडीओ पाहून आपल्याला धडकी भरते तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडीओ पाहून तर आपला दिवस बनतो. हसविणारे रडविणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होतं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा जगातील सर्वात कठीण डान्सचा आविष्कार दाखविणारा आहे.  झौली डान्स (Zaouli Dance Video) व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 


जगातील सर्वात कठीण नृत्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूनेस्को (UNESCO) नुसार आफ्रिकेतील अतिशय लोकप्रिय पारंपारिक आणि लोकनृत्य म्हणजे झौली डान्स (Zaouli Dance)...या डान्स सध्या यूजर्सला वेड लावतं आहे. हे जगातील सर्वात कठीण नृत्य मानलं जातं.  हा डान्स इतर कोणालाही करणे अशक्य आहे, असं म्हणतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा आफ्रिकन गुरो समुदाय फक्त करु शकतात. (trending zaouli worlds most difficult dance Michael Jackson stole steps from this famous dance Video Viral on Social media marathi news)



मायकेल जॅक्सनने डान्स स्टेप्स चोरल्या का?


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर असं म्हटलं जातं आहे की, मायकेल जॅक्सनच्या नेत्रदीपक डान्स मूव्ह्स जॉली नृत्य प्रकारातून घेतल्या गेल्या असतील. पण, याबाबत कधीही दुजोरा मिळालेला नाही. या नृत्याचं वैशिष्ट्य म्हणजे संगीताची लय, नर्तकाच्या पायाची हालचाल आणि नृत्य सादर करणाऱ्या व्यक्तीचा मुखवटा.  तर हे नृत्य निसर्गाशी निगडित असतं. हे नृत्य सामाजिक कामांसाठीही केलं जातं.