तिळ्या बहिणींचं भन्नाट प्लॅनिंग; एकाचं वेळी राहिल्या गरोदर
आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या भावंडांची साथ.
वॉशिंग्टन : आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या भावंडांची साथ. आयुष्याच्या चांगल्या वाईट प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन फार महत्त्वाचा असतो. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये तीन बहिणींनी एक साथ जन्म घेतला. आयुष्यातील अनेक कठीण टप्पे या तीन बहिणींनी सहज पार केलं. पण आज त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. एकत्र जन्म घेतलेल्या या बहिणी आता एकत्र त्यांच्या मुलांना जन्म देणार आहेत. या तीन बहिणी काही महिन्यांच्या अंतरावर त्यांच्या मुलांना जन्म देणार आहेत.
या तीन बहिणींचं नाव गिना, नीना आणि विक्टोरिया आहे. वयाच्या 35 व्या वर्षी त्या एकत्र गरोदर राहिल्या आहेत. त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. जसं या तीन बहिणींमध्ये प्रेम आहे, तसंच त्यांच्या मुलांमध्ये असावं अशी आशा गिना, नीना आणि विक्टोरिया यांनी व्यक्त केली आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत व्हिक्टोरियाने सांगितले की एकत्र गर्भवती राहणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.
सर्वप्रथम व्हिक्टोरिया गरोदर राहिली, त्यानंतर निनाने सर्वांना आनंदाची बातमी दिली. दोघी एकत्र आई होणार असल्यामुळे त्यांनी गिना देखील आई होण्याचा विचार करण्यास भाग पाडलं. त्यानंतर गिना देखील गरोदर राहीली. आता काही महिन्यांच्या अंतरावर तिघी बहिणी आणि सख्या मैत्रिणी आई होणार आहेत. सध्या या तिघी बहिणी आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवत आहेत.