नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या प्रजास्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेनं यासंदर्भात भारताच्या पराराष्ट्र खात्याला नकार कळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर अत्यंत महत्वाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात येण्यास असमर्थ असल्याचं ट्रम्प प्रशासनानं भारताला कळलं आहे. अमेरिकेनं दिलेल्या इशारा न जुमानता भारत आणि रशिया यांच्यात झालेला S 400 क्षेपणास्त्र शोध यंत्रणा खरेदीचा करार हेच या नकारा मागचं एक प्रमुख कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.