दुबई :  तुमच्या आयुष्यातील एखादा छानसा क्षण आठवणीच्या स्वरूपात कैद करण्याचा मार्ग म्हणजे फोटो. आजकाल सेल्फीचं वेड लहानग्यांपासून नेते मंडळींमध्येही आढळून येतं. काही वेळेस सेल्फी एक गोड आठवण देऊन जाते तर सेल्फीचं खूळ काहींच्या जीवावरही उलटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  सेल्फीच्या नादामध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना आपण बघितल्या आहेत, वाचल्या आहेत. त्यामुळेच  आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणारे पालट्सचे फोटोही अनेकांना आश्चर्यचकीत करत आहेत. 
दुबईच्या पामबीचवर कॉकपीटमधून बाहेर सेल्फीस्टिक काढून पायलटने काही सेल्फी क्लिक केल्याचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर दिसत आहेत. चालत्या विमानात, आभाळात इतक्या उंचीवर अशाप्रकारे सेल्फी कसा क्लिक केला जाऊ शकतो ? प्रवाशांच्या सुरक्षेचे काय ? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. 





 ‘पायलटगॅन्सो’या नावानं इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो हे खरे फोटो नसून फोटोशॉपची कमाल आहे. याबाबतचा खुलासा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे.