मुंबई : लहान मुलं ही देवाघरची फुलं, असं कायमच म्हटलं जातं. याच लहान मुलांची विविध रुपं अनेकदा पाहायला मिळतात. यामध्ये कधी ते अगदीच शांत असतात, तर कधी ते प्रचंड गोंधळ घालताना दिसतात. कधी गुपचूप एखादी खोडी करुन पळूनही जातात. अशा वेळी अनेकदा या लहानग्यांवर रागवण्याएवजी त्यांच्या खोड्या पाहून या बालबुद्धीवर आणि त्यांच्या निरागसतेवर हसू येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना नुकतीच घडली आणि त्या घटनेचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला. तुर्की येथे ही घटना घडली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जिथं हायवे टनलच्या उदघाटनासाठी तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोआन (Recep Tayyip Erdoğan) यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्याच हस्ते फित कापण्याचा कार्यक्रम पार पडणार होता. पण, त्यांच्या हस्ते फित कापलीच गेली नाही. 


कारण, त्यांनी फित कापण्यापूर्वी व्यासपीठावर असणाऱ्या एका लहान मुलानंच फित कापली. राष्ट्रपतींचं त्याच्याकडे लक्ष जातच त्यांनीही त्याला मजेशीर अंदाजात डोक्यात हळूच मारलं. एका वृत्तसंस्थेनं यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ इतरही युजर्सनी शेअर केला आहे. 



दिवसभराचा क्षीण घालवणारा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्ही त्या लहान मुलाला काय म्हणाल?