Turkey Syria Earthquake Lashed Out Pakistan: तुर्की (Turkey) आणि सीरियाला (Syria) सोमवारी 7.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसल्याने हजारो इमारतींची पडझड झाली आहे. या भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 8000 हून पुढे गेली आहे. सध्या तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु आहे. अमेरिक, चीन आणि भारतासारख्या मोठ्या देशांनी तुर्कीला मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने (Pakistan) भूकंपाच्या तिसऱ्या दिवशी तुर्कीला मदतीचा हात दिला. मात्र तुर्कीने पाकिस्तानला खडे बोल सुनावले (Turkey Lashed Out Pakistan) आहेत.


तुर्कीने काय म्हटलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्त समुहाने दिलेल्या माहितीनुसार तुर्कीने पाकिस्तानी नेत्यांना आमच्या देशात येण्याची काहीही गरज नाही. सध्या इथे मोठ्या प्रमाणात मदकार्य सुरु असून आम्ही त्यात व्यस्थ आहोत, असं कळवलं आहे. तुर्कीने हा टोला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना लगावला आहे. शरीफ हे तुर्कीचा दौरा करणार होते. मात्र त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आपला दौरा रद्द केला आहे.


काय होता पाकिस्तानी नेत्यांचा विचार


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्की सरकारच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाला पंतप्रधान शरीफ यांचा दौरा रद्द करावा असं सांगितलं. तुर्कीमध्ये भूकंपामुळे हाहाकार माजलेला असून सध्या संपूर्ण यंत्रणेचं लक्ष मदतकार्यावर आहे. पंतप्रधान शरीफ यांच्याबरोबरच परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि अन्य अधिकाऱ्यांना दोन्ही देशांमधील एकता दाखवण्याच्या उद्देशाने भूकंपग्रस्त तुर्कीचा दौरा करायचा होता. मात्र तुर्कीने याला नकार दिला आहे.


पाकिस्तानमध्ये टीका


पाकिस्तानने भूकंपग्रस्त तुर्कीला मदतीची घोषणा केली असता पाकिस्तानमध्ये यावरुन नवा वाद झाला. पाकिस्तानमधील सिव्हील सोसायटी आणि प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानने केलेल्या मदतीवरुन टीका केली आहे. लोकांनी पंतप्रधानांबरोबरच, परराष्ट्रमंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांच्या नियोजित यात्रेवरुन नाराजी व्यक्त केली आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट असताना अशी मदत करण्याला पाकिस्तानी लोकांनी विरोध केला आहे. याचमुळे सातत्याने सरकारवर टीका होत असून याच टीकेतून शरीफ यांचा दौरा रद्द करण्यात आलाय.