Road Accidents: भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू तर 51 हून अधिक जखमी
शनिवार (20 ऑगस्ट) हा घातवार ठरला आहे. दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 51 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.
मार्डिनः तुर्कस्थानमध्ये शनिवार (20 ऑगस्ट) हा घातवार ठरला आहे. दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 51 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे तुर्कस्थानमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
पहिला अपघात झाला आहे तो गझियानटेप (Gaziantep) येथे घडला असून प्रवाशी भरलेल्या बसचा हा अपघात झाला आहे. त्या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचवेळी, दुसरा अपघात हा मार्डिन शहरात झाला असून ट्रकवरचा चालकाचा ताबा सुटून अनेक लोकांना या ट्रकने (Truck Accident) चिरडले, या अपघातात 16 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही अपघातात अनेक जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भरधाव ट्रकने 32 जणांना चिरडून ठार केल्याने अनेक जणांना हा धक्का बसला आहे.
अनेक जण गंभीर
बस अपघात झाला त्याच वेली मार्डिनपासून 250 किमीवर एका ब्रेक फेल झालेला ट्रक गर्दीच्या ठिकाणी घुसल्याने 16 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी या अपघाताविषयी बोलताना सांगितले की, दुसऱ्या अपघातात 29 जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.