फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे इयान (Ian hurricane in Florida, USA) नावाच्या चक्रिवादळाने हाहाकार माजवला आहे. इयान चक्रिवादळामुळे याठिकाणी वादळ, पाऊस, पूर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीव्ही चॅनेल्सपासून सोशल मीडियापर्यंत या वादळाची भयानक दृश्ये पाहायला मिळत आहेत. वादळामुळे केवळ झाडे आणि गाड्याच नाही तर अनेकांची घरं देखील उद्ध्वस्त झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नैसर्गिक आपत्तीची बित्तमबातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि पत्रकार जीकरीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यन एक महिला पत्रकार रिपोर्टिंग करताना चर्चेत आली आहे. पावसामुळे माईक भिजू नये म्हणून महिला पत्रकाराने अनोखी शक्कल लढवली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


डेली स्टारच्या वत्तानुसार, NCB वृत्तवाहिनीच्या पत्रकार कायला गेलर (Kyla Galer) सध्या सोशल मीडियावर चर्चाचा विषय आहेत. रिपोर्टनुसार माईक भिजू नये म्हणून कायला यांनी त्यांच्या माईकला कंडोम लावला. या संबंधी कायलाने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे. 



कायला एक फोटो पोस्ट करत म्हणाली, 'अनेक लोक मला विचारत आहेत की, खरंच मी माईकला कंडोम लावला होता? तर हो... मी माईकला कंडोम लावला होता. याठिकाणी मुसळधार पाऊस आहे, जर माझ्या मायक्रोफोनमध्ये पाणी गेलं तर ते खराब होईल...'


कायला पुढे म्हणतात, 'जर मायक्रोफोनमध्ये पाणी गेलं असतं तर मला रिपोर्टिंग करता आली नसती. त्यांमुळे मला माईकला कंडोम लावावं लागलं.' सध्या कायला यांचा रिपोर्टिंग करताना फोटो व्हायरल होत आहे.