Entry in UAE : नावात काय आहे असं शेक्सपीअर म्हणून गेलेत. पण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) असं म्हणायला गेलात तर तुम्हाला माघारी परतावं लागू शकतं. कारण संयुक्त अरब अमिरातीने त्यांच्या देशात हवाईमार्गे  प्रवेश करणाऱ्यांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. तुमचे पूर्ण नाव नसेल तर तुम्हाला युएईमध्ये प्रवेश (Entry in UAE) मिळणार नाही. एअर इंडिया (Air India) आणि एआय एक्सप्रेसने (AI Express) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियमावली जारी केली आहे. हा नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त अरब अमिरातीने नव्या सूचनांनुसार, प्रवाशांना त्यांची दोन्ही नावे वापरावी लागतील. कोणतेही एक नाव वापरले तर त्यांना प्रवेश मिळणार  नाही. नवीन परिपत्रकानुसार 21 नोव्हेंबर 2022 पासून केवळ एक नाव असलेल्या प्रवाशांना अमिरातीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. 


जर कोणाचे असे नाव असल्यास ते INAD असे मानले जाईल. INAD म्हणजे Inadmissible Passenger. याचा अर्थ प्रवाशाला एखाद्या देशात प्रवास करण्याची परवानगी न देणे. अशा प्रवाशांना एअरलाइनद्वारे ते ज्या देशातून आले होते त्या देशात परत पाठवले जाते.


उदाहरणार्थ, एखाद्या प्रवाशाचे नाव किंवा आडनाव प्रविण आहे. जर त्याने प्रविण हे आडनावाच्या ठिकाणी लिहीले तर त्याला नाव नसेल. जर त्याने नावाच्या जागी प्रविण लिहीले तर त्याला आडनाव नसेल. त्यामुळे अशा प्रवाशांना व्हिसा दिला जाणार नाही. जर  आधीच व्हिसा मिळाला तर तो इमिग्रेशनवर रद्द केला जाईल.
मात्र प्रवीण कुमार असे नाव प्रवाशाने लिहिले तर प्रवीण हे मुख्य नाव असेल आणि कुमार हे आडनाव असेल तरच त्याला परवानगी दिली जाईल.


त्यामुळे आता तुम्ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रवासासाठी निघाला असाल तर तुम्हाला पूर्ण नाव लिहावं लागणार आहे.