दुबई : नोकरदार वर्गासाठी प्रत्येक देशात काही नियम ठरवून दिलेले आहेत. कामाची पद्धत, कामाचे तास यांचं नियोजन केलं जातं. साधारण नोकरदार वर्गासाठी 8 ते 9 तासांची कामाची वेळ असते. तर काही ठिकाणी कामकाजाचा सहा दिवसांचा तर काही ठिकाणी 5 दिवसांचा आठवडा असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण दुबईत काम करणं आता नोकरदार वर्गासाठी आणखीनच फायदेशीर ठरणार आहे. दुबई सरकारने पाच दिवसांच्या आठवडव्यातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


साडे चार दिवसांचा आठवडा
यूएई सरकारच्या मीडिया कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कामकाजाचा आठवडा आता 5 ऐवजी साडेचार दिवसांचा असेल. हा निर्णय 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. या घोषणेमुळे, UAE हा जगातला पहिला देश ठरेल जिथे एका आठवड्यात पाच दिवसांपेक्षा कमी कामकाजाचे दिवस असतील


शनिवार-रविवारी पूर्ण सुट्टी
नवीन वेळापत्रकानुसार सोमवार ते गुरुवार सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 पर्यंत कामाचे तास सुरू असतील. तर शुक्रवारी अर्धा दिवस असेल म्हणजे 
सकाळी 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना काम करावं लागेल.


कुटुंबियांना देता येणार वेळ
दुबईत कामकाजाचं वेळापत्रक यूएस, यूके आणि इतर युरोपीय देशांच्या वेळेप्रमाणे ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर काम आणि वैयक्तिक आयुष्यातील ताळमेळ साधण्यासाठी यूएई सरकारने ही घोषणा केली आहे.