दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणाऱ्या आणि भारतात परतण्याची इच्छा असलेल्या भारतीयांचा खर्च वाढणार आहे. कारण दुबईहून भारतात येणा-या विमानांच्या तिकीट दरात 10 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 2019 च्या तुलनेत तिकीट दरातील ही वाढ खूपच जास्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबई ते मुंबई उड्डाणांसाठी एअरलाइन्स 6,000 ते 8,000 रुपये (300 ते 400 दिरहम) आकारत आहेत, परंतु जुलैमध्ये यात वाढ होणार आहे.


जुलैपासून दुबई ते मुंबई उड्डाणासाठी 9,000 रुपये (1,000 दिरहम) पेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.


सध्या, दुबई ते कोची फ्लाइट तिकिटांची किंमत सुमारे 19,000 रुपये (900 दिरहम) आहे, परंतु जुलैपासून त्याची किंमत 42,000 रुपये (2,000 दिरहम) किंवा त्याहून अधिक असेल.


दुबई ते दिल्ली फ्लाइट तिकिटांची किंमत जुलैमध्ये 21,000 रुपये (1,000 दिरहम) असेल. सध्या त्याची किंमत सुमारे 6,000 रुपये (300 दिरहम) आहे.


भारतातून यूएईला जाणाऱ्या फ्लाइटच्या तिकिटांच्या किमतीही याच पद्धतीने वाढणार आहेत.


मुंबई ते दुबई या वन-वे ट्रिपचे तिकीट चार पटीने वाढून 54,000 रुपये (2,600 दिरहम) इतके होणार आहे. कोची ते दुबईचे फ्लाइटचे भाडे सध्या 21000 रुपये (1000 दिरहम) आहे, पण त्यासाठीही लोकांना 500 दिरहम किंवा त्याहून अधिक पैसे द्यावे लागतील.


दिल्ली ते दुबई प्रवास करण्‍याची योजना करणार्‍यांना हे ऐकून दिलासा मिळेल की जूनच्या मध्यात तिकीटाची किंमत रु. 25,000 (1,200 दिरहम) असेल. सध्या हे भाडे रु. 10,000 (500 दिरहम) ते रु. 21,000 (1000 दिरहम) पर्यंत आहे.


रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या वाढत्या किमती आणि पेट्रोल आणि डिझेलची मागणी पूर्ण करू न शकणाऱ्या इंधनाच्या तुटवड्यामुळे हवाई तिकिटांच्या किमती अलिकडच्या आठवड्यात वाढल्या आहेत. मात्र, याला सामोरे जाण्यासाठी विमान कंपन्यांनी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.


UAE मध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात, त्यामुळे या मार्गावरील हवाई प्रवास आणि तिकीट दराचा भारतीयांवर मोठा परिणाम होणार आहे.