चीनला मोठा धक्का... म्हणून ब्रिटनने जपानसोबत केली हात मिळवणी
सध्या अनेक देश चीन विरोधी आवाज उठवताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : चीन उगमस्थान असलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक कारणं सांगत कित्येक देश चीनच्या विरोधात उभे राहिले आहे. आता ब्रिटेनने देखील चीनला मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनच्या सरकारने ५ जी वायरलेस नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी जपानकडे मदत मागितली आहे. यापूर्वी ब्रिटेनमध्ये हुवावे 5G नेटवर्क डेव्हलप करणार होती. मात्र काही दिवसांपूर्वी ब्रिटनने चीनच्या हुवावेवर बंदी आणली आहे.
शिवाय अमेरिकेने देखील हुवावेवर बॅन लावले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये टेक्नोलॉजी आणि सिक्योरिटीवरून तणाव आहेत. याचसंबंधी ब्रिटन आणि जपानच्या अधिकाऱ्यांची बैठक टोकियोमध्ये पार पडली.
ब्रिटनच्या 5G नेटवर्कवरून हुवावे उपकरण हटवले
ब्रिटनने चीनच्या हुवावेपासून वेगळे होताना २०१७ पर्यंत आपले ५जी नेटवर्क वरून हुवावेचे उपकरण हटवण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेत देखील हुवावेवर बंदी
सद्य स्थिती पाहता अनेक देश चिनी ऍप्सवर आणि वस्तूंवर बंदी घालताना दिसत आहेत. आता अमेरिकेने देखील काही दिवसांपूर्वी हुवावेवर बंदी घातली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये टेक्नोलॉजी आणि सिक्योरिटीवरून तणाव आहेत.
भारतात देखील ५९ चिनी ऍप्सवर बंदी
भारत आणि चिनी जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकला. केंद्र सरकारने TikTok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन केले. त्यानंतर भारतीय रेल्वेने चिनी कंपनीचं ४७१ कोटींचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर चिनी कंपनीनं भारतीय रेल्वेविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.