मुंबई : प्रत्येकाला नेहमीच वाटतं की, आपल्याला भरपूर पगाराची नोकरी हवी. परंतु अनेकदा आपण चांगल्या पगारामुळे प्रोफेशनसोडूनही जॉब करतो. जर तुम्हाला म्हटले की, चिकन डिपर खान्यासाठी 1 लाख रुपये पगार दिला जाईल. तर तुम्ही तो कराल का? कोणीही व्यक्ती ही ऑफर नक्की स्विकारेल. ही जॉब ऑफर युकेची फूड कंपनीने दिली आहे. यासाठी कंपनीने जाहिरात जारी केली आहे.


चिकन डीपर्स टेस्टर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध फिश फिंगर कंपनी BirdsEyeने टेस्ट टेस्टरच्या रिक्त पदाची जाहिरात जारी केली आहे. कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे की, जो चिकन परफेक्ट टेस्ट करू शकेल तसेच त्याला करेक्ट करू शकेल. त्याचे चिकन डिपर्स देखील उत्तम असायला हवे. यासाठी कंपनी कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. कंपनीने जॉब डिटेल्सदेखील शेअर केले आहेत. यासाठी कंपनी 1 लाख रुपयांचा पगार देणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 'चीफ डिप्पिंग ऑफिसरची' पोस्ट दिली जाईल


चिकन डिपर्ससोबत सॉसदेखील बनवणार कंपनी


एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार ब्रिटनमध्ये बेरोजगारी आणि महागाई दोन्ही वाढल्या आहेत. अशा वेळी BirdsEyeला चिकन डिपर्स टेस्टरची गरज आहे. यासोबत कंपनी सॉस सुद्धा बनवणार आहे. 


असे करा अप्लायजर तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर, https://www.birdseye.co.uk/ या संकेतस्थळाला भेट द्या.