लंडन : फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या साप्ताहिक भत्यात तिप्पट वाढ करण्यात आलीय. लंडन उच्च न्यायालयानं विजय मल्ल्याला हा भत्ता वाढवून देण्याचे आदेश दिलेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मल्ल्याला आता आठवड्याला सुमारे १६ पूर्णांक २८ लाख रुपयांचा भत्ता मिळणार आहे. मल्ल्याची सर्व मालमत्तेवर जप्ती आलेली असल्यामुळे त्याला हा भत्ता मिळतोय. 


मल्ल्या याचा न्यायालयीन खर्च मोठा आहे. तसंच त्याच्या जीवनशैलीचा विचार करता न्यायालयानं त्याचा भत्ता १३ हजार ३२५ पाऊंड केलाय. 


लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात मल्ल्याविरोधात प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.