नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीच्या खटल्यावर २९ मार्चला सुनावणी होणार आहे. नीरवला लंडनमध्ये वेस्टमिनिस्टर पोलिसांनी अटक केली. भारताच्या विनंतीनुसार अटकेची कारवाई करण्यात आली असून त्याला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. मात्र न्यायालयाने त्याच्या खटल्यावरील सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे नीरव आता पोलिसांच्याच ताब्यात राहणार असल्याचे समजत आहे. इग्लंड आणि भारतामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा कायदा असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे त्याच्यावर कायदेशीर खटल्याला आता सुरूवात झाली आहे. भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणीदरम्यान नीरव मोदीने जामिनासाठी विनंती केली. तपास यंत्रणांना आपले पूर्ण सहकार्य राहील. प्रवासासंबंधीचे सर्व कागदपत्रे मी सादर करेन, असे त्याने न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याचा मुक्काम हा तुरुंगात असणार आहे. वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.  



भारतातून पळून गेलेला नीरव मोदी सध्या लंडनमध्ये छान जीवन जगत होता. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले होते.