युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा, रशियाने माघार घेण्याची युक्रेनची मागणी
Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. (Russia Ukraine War) दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे.
मास्को : Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. (Russia Ukraine War) युक्रेनचे मोठे नुकसान झाले असताना रशियालाही युक्रेनने मोठा दणका दिला आहे. रशियाचे अनेक टॅंक नष्ट केले आहेत. दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे. रशियाने युद्ध थांबवावे आणि सैन्यही मागे घेण्यात यावे, अशी युक्रेनने मागणी केली आहे. (Ukraine-Russia peace talks, Ukraine's demand for Russia's withdrawal)
अखेर युक्रेन रशिया शांतीचर्चा सुरू झाली आहे. रशियानं ताबडतोब युद्ध थांबवावं आणि सैन्य मागे घ्यावं, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली आहे. बेलारूसच्या सीमेवर आज दोन्ही देश युद्धावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी करणार आहेत. बेलारूसमध्ये युक्रेनचं शिष्टमंडळ दाखल झाले आहे.
आधी बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार नव्हता. युक्रेनने वॉरसॉ या शहरात चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. मात्र बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेनंतर युक्रेनच्या अध्यक्षांनी बेलारूस सीमेवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. ताबडतोब युद्ध थांबववावे आणि रशियानं युक्रेनमधून सैन्य मागे घ्यावे, या युक्रेनच्या प्रमुख मागण्या आहेत.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या किव्ह शहरात रहिवासी वसाहतीत शिरून हल्ला केलाय. त्या हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत. किव्ह शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न रशियन सैन्य करतंय. त्यातून रहिवासी वसाहती देखील सुटलेल्या नाहीत. नजर जाईल तिथं आग आणि धूर, तसेच युद्धाच्या उद्ध्वस्त खाणाखुणा दिसत आहेत.