मुंबई : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियावर काही निर्बंध लादले होते. यातील काही निर्बंध असे आहेत की, ज्यामुळे रशियाचा  स्पेस प्रोग्रामला कमजोर करतील. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. परंतु या निर्बंधांबाबत बोलताना  बिडेन म्हणाले की, रशियावर लावलेल्या या निर्बंधामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, आमच्या निर्बंधांमुळे रशियाच्या एरोस्पेस उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. या निर्बंधांमध्ये रशियन सैन्य, सागरी उद्योग, आर्थिक संस्था आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या लोकांवरही बंदी घालण्यात आली आहे.


व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या अंतराळ कार्यक्रमावर थेट कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. परंतु काही अतिसंवेदनशील तंत्रज्ञान रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. परंकु ही तंत्रे अवकाश उद्योगात वापरली जातात, ज्यामुळे त्यांच्या स्पेस प्रोग्रामवर याचा परिणाम होणार आहे.


अमेरिकेने रशियावर बंदी घातलेल्या गोष्टींमध्ये, पुढील वस्तुंचा समावेश आहे. त्यांनी सेमीकंडक्टर्स, टेलिकम्युनिकेशन्स, एन्क्रिप्शन सिक्युरिटी, लेझर, सेन्सर्स, नेव्हिगेशन, एव्हिओनिक्स आणि सागरी तंत्रज्ञानवर बंदी घातली आहे.


त्यात आता अमेरिकेच्या या बंदीमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर चालू असलेल्या कामावर परिणाम होईल का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अवकाश स्थानक, कक्षीय प्रवास आणि अंतराळवीरांचे प्रशिक्षण यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात करार झाला आहे. त्यामुळे या गोष्टींवर देखील या निर्बंधांचा परिणाम होणार आहे.


परंतु याचा परिणाम अंतरळार मोहिमेवर होणार नाही. नासा आणि रशियन स्पेस एजन्सी Roscosmos भविष्यातील अंतराळ मोहिमा एकत्रितपणे करत राहतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा वापर देखील ते सुरु ठेवतील. ज्यामुळे अंतराळवीरांचे प्रशिक्षण ही सुरूच राहणार आहे, असे नासाने सांगितले.



त्यांच्या या प्रशिक्षणामुळे अंतराळ स्थानकावर कधीही अंतराळवीरांची कमतरता भासणार नाही. नासाने सांगितले की, आम्ही ऑर्बिटल मिशन आणि ग्राउंड स्टेशन ऑपरेशन्सवर रशियासोबत जवळून काम करत आहोत. त्यात त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही.


सीएनएनच्या वृत्तानुसार, नासाचे हे विधान तेव्हा आले आहे जेव्हा Roscosmos चे संचालक डिमित्री रोगोजिन यांनी ट्विटकरत अमेरिकेला सांगितले की, जर तुम्ही ISSवर आमचे सहकार्य थांबवले तर स्पेस स्टेशनला अनियंत्रित होण्यापासून आणि अमेरिका किंवा युरोपवर कुठेतरी पडण्यापासून कोण वाचवेल? 500 टन वजनाची ही रचना भारत किंवा चीनवर पडण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला त्यांना घाबरवायचे आहे का?



पुढे ते अमेरीकेला म्हणाले की, आयएसएस रशियावरून उडत नाही, त्यामुळे धोका पूर्णपणे तुम्हालाच. तुम्ही ते उचलायला तयार आहात का? अशी देखील धमकी त्यांनी दिली. 


डिमित्रीच्या या वक्तव्यानंतर नासाने एक विधान केले की, 'स्पेस स्टेशनबद्दल अमेरिका आणि रशियाचे संबंध बिघडत नाहीत. ते एकत्र काम करतील.'