नवी दिल्ली : युक्रेनला लवकरच युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळू शकते. युक्रेनने युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला होता. याला EU संसदेने मान्यता दिली आहे. आज रात्री 9 वाजता युरोपियन युनियनच्या संसदेत मतदान होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UNSC मधून रशियाला बाहेर करा- ब्रिटेन


रशियाला सुरक्षा परिषदेतून बाहेर काढण्याचा देखील पर्याय असल्याची ब्रिटनने म्हटले आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल म्हणाले की, युक्रेनच्या सदस्यत्वाबाबत कोणताही निर्णय स्पष्टपणे घेणे आवश्यक आहे.'


युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला आज संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की 'आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. त्यांनी रशियन हल्ल्याला दहशतवादी म्हटले. तसेच रशिया सातत्याने क्षेपणास्त्रे डागत असल्याचेही म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यात 16 मुले ठार झाले. रशिया सामान्य लोकांवर क्षेपणास्त्रे डागत आहे.'


'रशियाला कोणीही माफ करणार नाही'


युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव येथे रशियाने नागरिकांना लक्ष्य केले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, खार्किव शहरातील मध्यवर्ती चौकात रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. रशियाला कोणीही माफ करणार नाही. ही घटना कोणीही विसरणार नाही.