मुंबई : आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय झाला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनच्या बाजूने निकाल लागला. युद्ध तातडीने थांबवावं असे आदेश आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिले आहेत. वाद वाढवू नका असं आयसीजे (ICJ) ने आपल्या आदेशात म्हटलंय. रशियाने बळाचा वापर केल्याने अत्यंत चिंतीत आहे असं आंतरराष्ट्रीय कोर्टाने म्हटलंय. या निकालावर आम्ही जिंकलो अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिलीय. 


रशियाने निर्णय स्वीकारला नाही तर काय होईल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आहे. 


युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांना रशियाला तात्काळ लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याचे आवाहन केले. यापूर्वी 7 मार्च रोजी रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली होती. रशियाने सुनावणीवर बहिष्कार टाकला होता.


झुकेगा नही ! अमेरिका आणि ब्रिटनवर रशियाचा पलटवार, जगभरात तणाव वाढणार


रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) मध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इतर देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत अनेक देशांनी रशियाविरोधात कठोर कारवाई केली आहे. आता त्या कारवाईवर रशियाने पलटवार केलाय. रशियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. पण हे कोणत्या प्रकारचे निर्बंध येणार आहेत याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.