Russia Ukraine War : यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की रूग्णालयात, फोटो व्हायरल
या दरम्यान राष्ट्रपती कीवमधील लष्करी रुग्णालयात पोहोचले
मुंबई : रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आजचा १९ वा दिवस आहे. रशिाया सतत युक्रेनवर हल्ला करत आहे. या युद्धात युक्रेनने आपलं बरंच काही गमावलं आहे. युक्रेनचे अनेक सैनिक या युद्धात मारले गेले आहेत. तसेच अनेक नागरिकांनी देखील आपला प्राण गमावला आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की आपल्या सैनिकांचे मनोधैर्य कमी होऊ देत नाहीत.
या दरम्यान राष्ट्रपती कीवमधील लष्करी रुग्णालयात पोहोचले. तिथे उपचार घेत असलेल्या जखमी सैनिकांना स्वत: राष्ट्रपती भेटायला आले आहेत यावर विश्वास बसत नव्हता.
झेलेन्स्की यांनी रुग्णालयात जखमी युक्रेनियन सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले.
झेलेन्स्की सैनिकांना भेटतानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
झेलेन्स्की यांनी सैनिकांना केलं सन्मानित
यादरम्यान झेलेन्स्की यांनी युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना पदक देऊन त्यांना 'युक्रेनचा नायक' घोषित केले. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, देशासाठी प्राणाची आहुती देणारे युक्रेन आर्मीचे वरिष्ठ लेफ्टनंट हुत्सुल वोलोडिमिर ऑलेक्झांड्रोविच यांनाही पदक प्रदान करण्यात आले.
ओलेक्झांड्रोविचने 25 रशियन लष्करी उपकरणे नष्ट केली आणि सुमारे 300 हल्लेखोर मारले, ज्यांनी देशासाठी लढताना आपले प्राण गमावले.
यूक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी शेअर केला फोटो
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने झेलेन्स्कीच्या हॉस्पिटल भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो सेल्फी काढताना दिसत आहे.
सैनिकांच्या भेटीदरम्यान ते म्हणाले, 'मित्रांनो, लवकर बरे व्हा. मला विश्वास आहे की तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट भेट आमचा विजय असेल.'