कीव : Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले. मला जिवंत पाहण्याची ही शेवटची वेळ असू शकते असं झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. (Russia Ukraine Crisis) युरोपीय युनिअनच्या नेत्यांशी काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यात त्यांनी हे विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेसिडेन्सी बिल्डींगबाहेरून काल त्यांनी एक व्हिडिओ शूट केला त्यात आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी, सार्वभौमत्वासाठी, आमच्या अधिकारासाठी लढत आहोत असं म्हटले आहे. ऑलिव्ह ग्रीन मिलिटरी कलर टीशर्ट घालून अध्यक्ष झेलेन्स्की, त्यांचे पंतप्रधान, लष्करप्रमुख आणि इतर मंत्र्यांसह त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. 



कीवमध्ये रशियन फौजेच्या काही तुकड्या पोहोचल्या आहेत. रशियन फौजांची कीवमध्ये काल रात्री प्रथमच युक्रेनच्या तुकड्यांसह चकमक झाली. दरम्यान मॉस्कोतून प्रसारित झालेल्या टेलिव्हिजन संदेशात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन लष्कराने झेलेन्स्की यांच्याविरोधात उठाव करून देश ताब्यात घ्यावा, असे आवाहन केले आहे. झेलेन्स्की सरकार दहशतवादी असून ड्रगच्या आहारी गेलेल्या निओनाझींची ही टोळी आहे, असे पुतीन म्हणाले होते.