न्यूयार्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्ष मारिया फर्नाडा एस्पिनोसा यांनी भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रशंसा करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सुषमा स्वराज या असाधारण महिला आणि नेत्या होत्या असं त्यांनी म्हटलं. सध्या ब्रिटेन दौऱ्यावर असलेल्या एस्पिसोना यांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपलं जीवन जनसेवेसाठी समर्पित करणारी असाधारण महिला आणि नेता सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने खूप दु:ख झालं.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज यांचं मंगळवारी दिल्लीत निधन झालं. एस्पिसोना यांनी म्हटलं की, 'भारत दौऱ्यावर असताना मला त्यांना भेटण्याचा सन्मान मिळाला. मी त्यांना स्नेहासह नेहमी आठवणीत ठेवेल.'



अफगाणिस्तानच्या अमेरिका मिशनने देखील ट्विट करत सुषमा स्वराज यांच्या निधनावर अफगाणिस्तानच्या जनतेकडून भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या प्रति संवेदना व्यक्त केली.



ग्लोबल ऑर्गेनाइजेशन ऑफ पीपुल ऑफ इंडियन ऑरिजिन (गोपियो) ने म्हटलं की, "त्यांच्या निधनाने आम्हाला एक राजकारणीसह ईमानदार आणि सक्षम नेता गमवल्याची भावना जाणवत आहे.'


गोपियोने पुढे म्हटलं की, 'संघटनेने त्यांच्यासोबत काम केलं. परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि भारतीय वंशांच्या व्यक्तींशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत मिळाली.'


हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे डायरेक्टर ऑफ गवर्नमेंट रिलेशन्स जय कंसारा यांनी म्हटलं की, स्वराज यांनी क्षेत्र (अमेरिका) आणि जगभरात हिंदू अल्पसंख्यकांची काळजी घेतली. "त्यांनी प्रत्येक समस्या सोडवली. त्या एखाद्या आई प्रमाणे समस्या सोडवत होत्या.'