या देशाने केली मोठी घोषणा, आता आठवड्यातून 4.5 दिवस काम
लोकांसाठी काम करणे आता अधिक फायदेशीर ठरेल. एका आखाती देशाने जगात प्रथमच एक मोठा पुढाकार घेतला आहे.
दुबई : लोकांसाठी काम करणे आता अधिक फायदेशीर ठरेल. एका आखाती देशाने जगात प्रथमच एक मोठा पुढाकार घेतला आहे. आठवड्यात काम करण्याचे दिवस कमी केले आहेत. आता कामाचे दिवस 5 दिवसांपेक्षा कमी करण्याची घोषणा या देशाने केली आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) काम करणे आता लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. सरकारने आता आठवड्यातील पाच दिवस काम करण्याची मर्यादा आणखी कमी केली आहे.
आता आठवडा फक्त साडेचार दिवसांचा
यूएई (UAE) सरकारच्या मीडिया कार्यालयाने सांगितले की, देशातील कामकाजाचा आठवडा आता पाच ऐवजी साडेचार दिवसांचा असेल. सरकारचा हा आदेश पुढील वर्षी अर्थात 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. या घोषणेमुळे, UAE हा जगातला पहिला देश बनेल ज्यामध्ये एका आठवड्यात पाच दिवसांपेक्षा कमी कामकाजाचे दिवस असतील.
शनिवार-रविवार सुट्टी असेल
सरकारने सांगितले की, नवीन वेळापत्रकानुसार सोमवार ते गुरुवार सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 पर्यंत कामाचे तास सुरू होतील. दुसरीकडे, शुक्रवारी सकाळी 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत काम केले जाईल. हा दिवस कामकाजाचा अर्धा दिवस असेल.
कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकाल
असे मानले जात आहे की, देशातील व्यावसायिक अॅक्टिव्हिटीज वाढविण्यासाठी सरकारने आपले कामकाजाचे वेळापत्रक यूएस, यूके आणि इतर युरोपीय देशांप्रमाणे ठेवले आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्यातील ताळमेळ सुधारण्यासाठी यूएई सरकारने ही घोषणा केल्याचेही बोलले जात आहे.