काबूल : तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तान (Afganistan) ताब्यात घेतलाय. त्यामुळे आता अफगाणिस्तानातील सर्व राज्यकारभार तालिबानी पाहणार आहेत. मात्र अफगाणिस्तावर कब्जा मिळवल्या मिळवल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी तालिबानला मोठा दणका दिलाय. या निर्णयामुळे अफगाणिस्तानचं आर्थिकरित्या कंबरडं मोडलं जाणार आहे.  राज्यकारभार चालवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसा असावा लागतो. पण आता तोच पैसा अफगाणिस्तानकडे नाहीये, यामुळे तालिबानला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार आहे.  (United State freezes $9.5 billion in assets of Afghanistans central bank)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका काय दणका दिलाय?  


अफगाण सरकारची अमेरिकन बँकांमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलर्सची मालमत्ता होती. ही मालमत्ता आता  सील करण्यात आली आहे. त्यामुळे आता तालिबान्यांची आर्थिक कोंडी झालीय. नागरिकांना मुलभूत सेवा पुरवण्यासाठी, तसेच शिक्षण, संरक्षण, या क्षेत्रातील विकासासाठी पैसा लागतो. त्यामुळे ताब्यात घेतलेला देश चालवण्यासाठी तालिबानकडे निधीच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे आता तालिबान्यांची चांगलीच गोची झालीये. तसेच द अफगाणिस्तान बँक या देशाच्या शिखर बँकेची बरीचशी संपत्ती परदेशांमध्ये ठेवली आहे. तिथपर्यंत पोहोचणं तालिबानला अशक्य असल्याचं मानलं जातंय.