वॉशिंग्टन : अमेरिकेने गेल्या पंधरावर्षांपासून पाकिस्तानला तीन हजार तीनशे कोटी डॉलर्सची केलेली मदत म्हणजे मुर्खपणाच असल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय. 


खोटारडेपणा आणि फसवणूकच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानने अमेरिकेच्या नेत्यांना मुर्खात काढत केवळ खोटारडेपणा आणि फसवणूकच केल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केलाय. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय.



दहशतवाद्यांना आसरा


अमेरिका अफगाणिस्तानमध्ये अतिरेक्यांवर कारवाई करतं आणि पाकिस्तान या दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचाही घणाघाती हल्ला ट्रम्प यांनी पाकिस्तानवर केलाय. मात्र यापुढे हे चालणार नसल्याचा सज्जड इशाराही ट्रम्प यांनी दिलाय.