वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका तीन नोव्हेंबरला होणार आहेत. याआधीच अनेक वादविवाद समोर येत आहेत. त्यात आता अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने एक दावा केला आहे. रशिया, चीन आणि इराणशी संबंधित हॅकर्स सध्या अमेरिकेतील निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवतायत असा दावा मायक्रोसॉफ्टनं केला आहे. चीनी हॅकर जो बायडन यांच्या तर इराणी हॅकर्स ट्रम्प समर्थकांवर नजर ठेऊन आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुकांचा रणधुमाळी सुरू आहे. अमेरिकन्स मतदान करतील. लॉन्स एंजिलिसमध्ये सार्वजनिक ठिकाणी टपाली मतदारांसाठी ड्रॉप बॉक्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक वाचनालयं आणि क्लब्जच्या बाहेर हे बॉक्स उपलब्ध आहेत. 


५ ऑक्टोबरला टपाली मतदान होईल आणि त्याच दिवशी त्याची मोजणी होईल. मात्र टपाली मतदानामुळे गैरप्रकार वाढतील असा दावा अध्यक्ष ट्रम्प यांनी केला आहे. मात्र ते स्वतः टपाली मतदानच करतात हे विशेष आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाची चर्चा सुरु झाली आहे.