वॉशिंटन : अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
 
टेड योहोचं मत


अमेरिकेच्या परराष्ट धोरणाबाबतच्या आशिया आणि पॅसिफिक उपसमितीचे अध्यक्ष, टेड योहो यांनी वन बेल्ट वन रोड हा प्रकल्पामागे चीनची आत्मकेंद्री महत्वाकांक्षा असल्याची टिका केली आहे. मध्य आशियातील पायाभूत सुविधांच्या सुधारणेतून व्यापारवृद्धि हा जरी वन बेल्ट वन रोडचा हेतू असला तरी चीनचं राष्ट्रीय हितच यात दडल्याचं मत त्यांनी व्यक्त केलयं.


वन बेल्ट वन रोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राचीन रेशम मार्गांचं चीन पुनरुज्जीवन करू पाहतोय. त्यासाठी चीन मध्य आशियातील देशांमध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणा करतोय. 


अमेरिकी तज्ञांची चिंता


या प्रकल्पाची कामं चिनी कंपन्यांनाच मिळत आहेत. तसंच यात चिनी मनुष्यबळ आणि साधनांचाच वापर केला जात असल्यामुळे यातून फक्त चीनचच हीत साधलं जातयं, असं त्यांनी म्हटलयं. वन बेल्ट वन रोड या प्रकल्पात पर्यावरण आणि मानवी हक्कांची पायमल्ली होतेय. तसंच अविकसित देशांच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर चीन स्वत:च्या फायद्यासाठी करतो आहे, असं मत अनेक अमेरिकी तज्ञ व्यक्त करतायेत. मात्र त्याचबरोबर आपण वन बेल्ट वन रोड थांबवू शकत नाही, पण त्यात सकारात्मक बदलांसाठी आपण प्रयत्नशील असलं पाहीजे असंही मत अमेरिकी तज्ञ व्यक्त करतायेत.


अमेरिका, भारतासमोर आव्हान


वन बेल्ट वन रोड या प्रकल्पातून चीन आपलं लष्करी सामर्थ्य वाढतोय. यासाठी तो रस्ते आणि समुद्री मार्गांचा चलाखीने वापर करतोय. चीनच्या या डावपेचांनी अमेरिका, भारतासकट अनेक देशांसमोर आव्हान उभं केलयं.